23.3 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home विदर्भ जमईवार अर्जुनी मोरगावचे बिडीओ

जमईवार अर्जुनी मोरगावचे बिडीओ

0
41

गोंदिया, -गोंदिया जिल्हा परिषदेतंर्गत येत असलेल्या तिरोडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (श्रेणी 1) नारायणप्रसाद जमईवार यांची कार्यकाळ पुर्ण होण्याआधीच तिरोडा पंचायत समितीतून अर्जुनी मोरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून बदली झाली आहे.जिल्हा परिषदे्च्या सामान्य प्रशासन विभागाने 20 जुले रोजी जमईवार यांना दुपारनंतर तिरोडा पंचायत समिती येथून पदमुक्त केले आहे.
विशेष म्हणजे गटविकास अधिकारी हे पद विकास सेवेशी असल्याने ते पद रिक्त झाल्यावर त्या पदाचा अतिरिक्त प्रभार हा विकास सेवेशी संबधित अधिकारी यांच्याकडेच दिला जातो.परंतु गोदिया जिल्हा परिषदेत चुकीची परंपरा लावून देणघेणाचे सोपस्कार पार पाडून पशुसवर्धन विभागातील अधिकारी यांना अतिरिक्त पदभार सोपण्याचे काम सुरु आहे.पशुुधन विभागाच्या अधिकारींना पदभार देऊन विकास सेवेंत्तर्त येत असलेल्या पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी,कृषी विभागाचे पंचायत समितीचे कृषी अधिकारी आदीवर अन्याय करण्याचे काम निव्वळ स्वार्थासाठीच काही अधिकारी करु लागले आहेत.