याकूब मेमनची फाशी १४ दिवस पुढे ?

0
10

वृत्तसंस्था,
मुंबई,दि. २३ –१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी याकूब मेमनची फाशी १४ दिवस पुढे ढकलली आहे. याकूबने महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे दया याचिका केली आहे. ही याचिका राज्यपालांनी फेटाळली असली तरी सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार, फाशीची अंमलबजावणी करण्यासाठी १४ दिवसांचा अवधी दिला जातो. त्यामुळे याकूबला ३० जुलैला फाशी देण्याचे शक्य नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
याकू बने राज्यपालांकडे दयेचा अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता त्याच्या दयेच्या अर्जाबाबत चर्चा सुरू झाली असून १४ दिवस यावर निर्णय होण्याची शक्यता कमी असल्यामुळे त्याच्या फाशीवरील निर्णय लांबणीवर पडला आहे. तसेच फाशीची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला त्याची दया याचिका फेटाळण्यात आल्याची सूचना द्यावी लागते. त्यानंतर १४ दिवसांनंतरच त्याला फाशी देऊ शकतात. त्यामुळे याकूब मेमनची फाशी तूर्तास १४ दिवस टळल्याचं सांगितले आहे.