गोदामातून दीड कोटींचा धान गायब; सालेकसा साेसायटीतील १५ जणांवर गुन्हा दाखल  

0
177
 गोंदिया : सालेकसा तालुक्यातील समृद्ध किसान शेती उद्योग साधन सामग्री पुरवठा व खरेदी विक्री सेवा सहकारी संस्था मर्यादीत सालेकसा नोंदणी क्रंमाक १०७० च्या अध्यक्ष, सचिवा सह १५ संचालक मंडळावर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पणन अधिकारी मनोज बाजपेयी (४९) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.समृद्ध किसान संस्था सालेकसा या संस्थेने पणन महासंघा सोबत केलेल्या करारनाम्या प्रमाणे व शासनाच्या वेळोवेळी निर्गमीत करण्यात येणाऱ्या नियम व अटीच्या अधिन राहून धान खरेदी करायची होती. पणन हंगाम २०२१-२२ मध्ये या संस्थेने शेतकऱ्यांचे धान खरेदी केल्यानंतर त्याची साठवणूक करण्याची पूर्ण जबाबदारी येते. खरेदी केलेला धान पणन महासंघाच्या देण्यात आलेल्या डिओप्रमाणे भरडाई करण्याकरीता मिलधारकांना धानाची उचल देणे बंधनकारक आहे. परंतु दिलेल्या डिओप्रमाणे समृद्ध किसान संस्था, सालेकसा यांनी मिलर्सना धान उचल दिला नाही.डिओ दिलेले मिलर्स यांनी धान उचल देत नसल्याबाबत जिल्हा पणन अधिकारी,गोंदिया यांचेकडे लेखी तक्रार दिल्या आहेत.समृद्ध किसान संस्थेस वेळोवेळी धान उचल देण्याकरीता नोटीस देण्यात आल्या.मात्र, संस्थेकडून नोटीसचे उत्तर देण्यात आले नाही व धान उचलही देण्यात आलेले नाही.यामुळे संस्थेच्या गोदामांमध्ये धान साठ्याची पाहणी करण्याकरीता १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ दरम्यान मार्केटींग अधिकारी मनाेज बाजपाई,सहायक नि बंधक, सालेकसा, श्रेणी – १ संजय गायधने, सहायक जिल्हा पुरवठा अधिका री धनंजय यशवंत देशमुख,ज्ञानदेव तनपुरे, हरीष चेटुले पाहणी करण्यास गेले.यावेळी समृद्ध किसान संस्थेने भाड्याने घेतलेल्या साकरीटोला येथील उर्मिला दोनोडे यांच्या मालकीचे गोदाम व रोंढा येथील अनिल अग्रवाल यांच्या मालकीच्या गोदामातून तब्बल ८००० क्विंटल धान गायब होते.त्या धानाची किंमत १ कोटी ५५ लाख २० हजार रुपये सांगितले जाते.
 हंगाम २०२१-२२ मधील धानाची केली अफरातफर
महाराष्ट्र स्टेट को -ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमीटेड सोबत समृद्ध किसान संस्था सालेकसा या संस्थेने पणन महासंघा सोबत केलेल्या करारनाम्या प्रमाणे व शासनाच्या वेळोवेळी निर्गमीत करण्यात येणाऱ्या नियम व अटीच्या अधिन राहुन धान खरेदीचे कार्य करायचे होते. परंतु तसे न करता पणन हंगाम २०२१-२२ मध्ये सदर संस्थेने शेतकऱ्यांचे धान खरेदी केल्यानंतर त्याची साठवणूक करण्याची पूर्ण जबाबदारी येते. व खरेदी केलेला धान पणन महासंघाच्या देण्यात आलेल्या डिओप्रमाणे भरडाई करण्याकरीता मिल धारकांना धानाची उचल देणे बंधनकारक असतांना डिओप्रमाणे धान समृद्ध किसान संस्था,सालेकसा यांनी मिलर्सना दिलेच नाही.
संस्थेचे अध्यक्ष वासुदेव महादेव चुटे रा. आमगाव खुर्द, सालेकसा, भोजलाल अंतुलाल बघेले, राघोंशी , घनश्याम बहेकार रा. ईसनाटोला , रोशनलाल वसंतराव राणे रा.लोहारा, प्रेमलाल तुरकर, घनश्याम नागपुरे रा.मुंडीपार, राजेंद्र बहेकार रा.बोदलबोडी , खेमराज उपराडे रा.मुंडीपार,दुलीचंद मोहारे रा.गोवारीटोला,ग्यानीराम नोणारे रा. भजेपार, उमेश लहु वलथरे, मु.पो .गिरोला,वंदना अंबादे, रा. आमगाव खुर्द, लिला धुर्वे, जमाकुडो , व्यवस्थापक जगदीश खोब्रागडे, रा.सालेकसा, ग्रेडर अजय भरत फुंडे, रा. आमगाव खुर्द यांच्या वर गुन्हा दाखल केला आहे.