कोसबी परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

0
27

गोंदिया :सडक अर्जुनी तालुुक्यातील कोसबी परिसरात मागील आठ-दहा दिवसांपासून एका बिबट्याने धुमाकूळ घातला होता.या बिबट्याने पाच-सहा जनावरांची शिकार केली होती. त्यामुळे पशुपालक आणिगावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या बिबट्याला कोसबी गावात वन विभागाच्या चमूनेगुरुवारी (दि.१३) रात्री ८ वाजताच्या सुमारास जेरबंद केले. त्यामुळे गावकऱ्यांनी सुटकेचा नि :श्वास टाकला. सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येणाऱ्या कोहमारा सहवनक्षेत्रातील कोसबी गावात गुरुवारी सायंकाळी६:३०च्या सुमारास भीमराव शालिग्राम गहाणे यांच्या घरात बिबट्याने ठाण मांडले होते.ते याची माहिती गावकऱ्यांनी वनविभागाला दिली.माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरालावला . रात्री ८ वाजताच्या सुमारास बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. यानंतरगावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला .