27.3 C
Gondiā
Monday, July 27, 2026
Home गुन्हेवार्ता झाडावरुन पडला कामगार, पोटाला चिरून निघाली लोखंडी अँगल

झाडावरुन पडला कामगार, पोटाला चिरून निघाली लोखंडी अँगल

0
45

तुमसर :- झाडावरून पडून भितींच्या कुंपणावरील लोखंडी अँगल पोटात शिरल्याने पोटातील आतळ्या बाहेर येऊन कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.घटनेनंतर तुमसर येथील सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयात जखमी कामगार ताराचंद बांते (पालोरा)यावर  उपचार सुरु करण्यात आले. यासंदर्भात संबंधित ठेकेदाराने सांगितले की, माडगी येथील श्रीनबाई नेत्रावाला सीबीएसई शाळेतील घटना असून मजुरी काम करताना ताराचंद बांते, पालोरा ४५ वर्षीय कामगार झाडावर चढला.तोल सांभाळता न  आल्याने हा मजूर झाडावरून कोसळून खाली असलेल्या कुंपणावर पडला. कुंपणाच्या धारदार लोखंडी टोकदार अँगलवर पडला त्यामुळे अग्रभाग कामगाराच्या पोटाला चिरून निघाला.

blank