धावत्या दुचाकीवर अनियंत्रित ट्रक उलटला
अर्जुनी मोर.-तालुक्यातील अर्जुनी मोर. – वडसा मार्गावरील गौरनगर जवळ भीषण अपघात घडून दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घटना १३ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० ते ९ वाजताच्या दरम्यान घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक मोरेश्वर काळबांधे (वय ४८ वर्ष) व रमेश बिसन साउस्कर, (वय वर्ष ४९ ) दोघेही रा. इंदोरा ता. लाखांदूर जि.भंडारा हे दुचाकी हिरो होंडा कंपनीच्या स्पेलेंडर क्रमांक MH-36-N-9645 ने अर्जुनी वरून वडसा मार्गे प्रवास करत होते. दरम्यान मागून १८ चाकी ट्रक क्रमांक CG-04-NB-1048 येत होता मात्र ऐन नागमोडी वळणावर ट्रकचे संतुलन बिघडले अचानक ट्रॅक पलटी झाला त्याचवेळी बाजूने जात असलेली दुचाकी दाबल्या गेली या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठविले ट्रक वाहन चालक स्थळावरून फरार झाला आहे. त्याविरुद्ध भांदवी २८१,१०६, १८४ मोटार वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघाताबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहनकर. शेंडे करत आहेत.





