25.2 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home गुन्हेवार्ता टिप्परच्या धडकेत दासगाव येथे महिलेचा मृत्यू

टिप्परच्या धडकेत दासगाव येथे महिलेचा मृत्यू

0
296

गोंदिया,दि.०३- जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरू असून तालुक्यातील दासगाव येथे आज शुक्रवारी दुपारी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने (MH – 40 BH 8080) स्कूटर चालवत असलेल्या महिलेला धडक दिल्याची हृदयद्रावक घटना घडली.या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला असून रामेश्वरी धनलाल नागपुरे (वय ४५,रा.कटंगी कला, गोंदिया) असे मृत महिलेचे नाव आहे. मध्य प्रदेशातील आरंभा येथे सासूच्या अंत्यसंस्कारासाठी मुलगी वैष्णवीसोबत स्कूटीवरून जात असताना वाळूने भरलेल्या टिप्परने त्यांना धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला.या घटनेत मृताची मुलगी वैष्णवी गंभीर जखमी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी रास्ता रोको करून अवैध वाळू वाहतूक बंद करण्याची मागणी केली. त्यामुळे येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रोहीणी बानकर,तहसिलदार समशेर पठाण व इतर वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना समजविण्याचे प्रयत्न केले.