तिरोडा-तिरोडा-तुमसर मार्गावर रात्रीच्या सुमारास भीषण अपघात घडला. कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन मलपुरी येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाला.मृत तरुणाचे नाव सौरभ उमेश बघेले,रा. मलपुरी असे आहे. अपघात रात्री 8 वाजताच्या सुमारास घडला.सोबती शिवम चुन्नीलाल अम्बुले ( 25रा.मलपुरी) गंभीर जखमी झाला आहे.अपघातानंतर पांढऱ्या रंगाची Maruti Swift Dzire कार MH35AG2785 क्रमांकाची रस्त्याच्या कडेला थांबली होती. कारच्या समोरील डावा भाग पूर्णपणे चुरडा झाला होता. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व तिरोडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.मृतदेह तिरोडा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. कारचालकाला ताब्यात घेऊन तिरोडा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे.





