रामदेव महाराज यांच्या उपस्थितीत मुल येथे योग शिबिरास प्रारंभ

0
4

मुल,दि.२०ःयोगऋषी रामदेव महाराज यांच्या उपस्थितीत चंद्रपूर जिल्ह्यातील मुल शहरातील कर्मवीर महाविद्यालयाच्या क्रिडांगणावर तीन दिवसीय योग चिकित्सा व ध्यान शिबिराला आज सकाळी 5 वाजता प्रारंभ झाला. तीन दिवस चालणाऱ्या या शिबिराचे उदघाटन आज रामदेव महाराज यांनी केले. चंद्रपूर जिल्हा हा विकासाच्या मार्गावर अग्रेसर होत असताना या जिल्ह्यात आम्ही उत्तम आरोग्य सेवा नागरिकांना देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. जिल्ह्यातील नागरिक निरोगी राहावे यासाठी आम्ही हे शिबिर आयोजीत केले आहे. योगाच्या माध्यमातून निरामय आरोग्यासह राष्ट्रभक्तीचा संदेश सुद्धा मिळतो, असे प्रतिपादन पत्रकारांशी संवाद साधतांना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
यावेळी पतंजली योग समितीचे विष्णू भुतडा यांनी योगाचे महत्व विशद केले. त्यानंतर रामदेव महाराज यांनी उपस्थित विशाल जनसमुदायास योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवली. नागरिकांनाही योगासने केलीत. या योग शिबिरास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. तसेच आज सायंकाळी विशाल शेतकरी मेळावा पाहायला मिळाला आज सायंकाळी 4 वा वाजता क्रिडांगणावर रामदेव महाराज यांच्या उपस्थितीत विशाल शेतकरी मेळावा आयोजीत करण्यात आला असून या मेळाव्याला शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते.