26.6 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home गुन्हेवार्ता अवैध दारुविक्रेत्याला तडीपार करा

अवैध दारुविक्रेत्याला तडीपार करा

0
20
गोंदिया,दि.18 : दारूबंदी समितीच्या अध्यक्षा व सदस्यांवर अ‍ॅसीड टाकण्याची धमकी देणाºया गावातील अवैद्य दारुविक्रेत्यावर कारवाई करून तडीपार करण्याचा ठराव फुलचूर  येथील ग्रामसभेत घेण्यात आला. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी अशोक चन्ने होते. यावेळी गावातील अवैद्य दारुबंदीवर चर्चा करण्यात आली. दरम्यान अध्यक्षांच्या संमतीने दारूबंदी समितीच्या अध्यक्ष कल्पना कुंभरे व सदस्यांना मारहाण व अ‍ॅसिड टाकण्याची धमकी गावातील अवैद्य दारुविक्रेत्यावर कारवाई करून तडीपार करण्याचा ठराव मांडण्यात आला. त्यांना कल्पना कुंभरे व राणी बैस अनुमोदन दिले.
दरम्यान याबाबतचा ठराव पारीत करून तंटामुक्त समितीच्या मासिक सभेत पारीत करून संबंधित मागणीचे निवेदन संबंधित विभागाला देण्याचा निर्णय घेण्यात आला.
ग्रामसभेला ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामसचिव, तंमुस पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.