25.3 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home गुन्हेवार्ता ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस अधिकार्याविरुध्द गुन्हा नोंदविण्याची प्रकिया सुरु

ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस अधिकार्याविरुध्द गुन्हा नोंदविण्याची प्रकिया सुरु

0
24

गोंदिया,दि.01ः-गोंदिया जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या एका विशेष पथकातील पोलीस अधिकारीकडून एका महिलेचा अवमान करुन विनयभंग केल्याची चर्चा सुरु झाली असून याप्रकरणात सदर तक्रार दाखल करण्यासाठी सदर महिला गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.सदर पिडीत महिला ही त्या विशेष शाखेला काही घटनांची माहिती पुरविण्याचे काम करीत होती अशी चर्चा आहे.या दरम्यानच संबधित पोलीस अधिकारी व महिलेची चांगली ओळख झाली.या ओळखीचा गैरफायदा सबंधित अधिकार्यांने घेतल्याची पिडीत महिलेची म्हणने असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.सदर पोलीस अधिकारी गेल्या अनेक वर्षापासून याच गोंदिया पोलीस कार्यालयातच कार्यरत असल्याची चर्चा आहे.यावरुन सदर अधिकारी याचे वरच्या पातळीवर चांगले संबध असावेत हे नाकारता येत नाही.