राज्यातील 287 वैद्यकिय अधिकार्यांच्या बदल्या

0
12
गोंदिया,दि.01ः- राज्यसरकारच्या आरोग्य विभागाच्यावतीने राज्यातील वैद्यकिय अधिकारी तसेच आरोग्य सेवा गट अ वैद्यकिय अधिकारी यांच्या प्रशासकीय बदल्यांचे आदेश  31 मे रोजी काढले आहेत.या आदेशात राज्यातील 287 वैद्यकिय अधिकार्यांची नावे आहेत.त्यामध्ये गोंदिया व भंडारा जिल्हयातील काही नामवंत वैद्यकिय अधिकारी यांचाही समावेश आहे. देवरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. दीपक धूमनखेड़े यांची बदली चंद्रपूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे करण्यात आली आहे.तर त्यांच्या जागेवर ज़िल्हा रुग्णालय चंद्रपूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. दीप्ति श्रीरामे यांची नियुक्ति करण्यात आलेली आहे.
डॉ. अश्विन अगड़े उप ज़िल्हा रुग्णालय चिमुर यांची प्राथमिक आरोग्य केंद्र कालीमाटी येथे नियुक्ति, डॉ. प्रदीप कांबले बी.जी.डब्लू गोंदियातून PHC औरादा जि. औरंगाबाद येथे, डॉ. जोत्शना गलार ज़िल्हा रुग्णालय गोंदिया वरुन उपकेंद्र पारशिवनी, डॉ आनंद लाडे गोंदिया यांची बदली  प्रादेशिक मनोरुग्नालय नागपुर येथे, डॉ. केतन खरवडे PHC दवनिवाडा वरुन PHC तिस्टी नागपुर येथे, डॉ. काँचन रहांगडाले  PHC मूलचेरा,डॉ. डी.टी. खंडारे प्रा अ कें आंधंलगांव भंडारा यांची प्रा.आ.केंद्र मालेवाडा ता.कुरखेडा,जि.गडचिरोली
,डॉ. लेखा पी. बडोदेकर प्रा.आ.केंद्र डव्वा यांची प्रा.आ.केंद्र तितुर जि.नागपूर,डॉ.ए.एम.जुगनाके प्रा.अ.केंद्र खमारी (भंडारा) यांची प्रा.आ.केंद्र डव्वा गोंदिया,डॉ. वैशाली दहगे प्रा.अ.कें भूयार यांची प्रा अ केंद्र साटक ता पारशिवणी,डॉ.व्ही.पी.मेश्राम तालुका वैद्यकिय अधिकारी पवनी यांची प्राथमिक आरोग्य केंद्र वरठी येथे बदली करण्यात आल्याचे प्रशासकीय आदेश काढण्यात आले आहेत.