देवरीच्या बीआरसीमध्ये चोरीःसंगणक पळविले

0
11
देवरी,दि.5- स्थानिक गट साधन केंद्र (बीआरसी) मध्ये आज रात्री खिडकीचे गज तोडून चोरी केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, देवरी पोलिसात या प्रकरणी तक्रार करण्यात आली आहे.
सविस्तर असे की, देवरी पंचायत समितीचे गटसाधन केंद्र चिचगड रोडवर आहे. या कार्यालयाच्या खिडकीचे गज तोडून चोरट्यांनी एक संगणकाचे सीपीयु, दोन मॉनिटर आणि एक मोडेम लांबविला आहे. उल्लेखनीय म्हणजे ज्या संगणकात शासकीय माहित संग्रहित आहे केवळ तोच सीपीयू चोरट्यांनी लांबविला हे विशेष. तेथे असलेले अन्य दोन सीपीयूंना चोरट्यांनी हात न लावता केवळ या संगणकाचे मॉनिटर पळविले तर जो सीपीयू चोरला त्याचा मॉनिटर मात्र सोडून दिला. याशिवाय तेथे जवळच असलेले दोन प्रिंटर्संना मात्र चोरट्यानी हात लावले नाही. या चोरलेल्या मालाची किंमत 37 हजार 200 असल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले. या चोरीच्या प्रकारानंतर शासकीय कामाचा वेग मंदावणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.