शेतकऱ्याकडून लाच घेताना अभियंत्याला रंगेहाथ पकडले

0
8

चंद्रपूर,दि.17ः- सिंचन विहीरीचे अंतीम बिल मंजूर करण्यासाठी चार हजार रूपयाची मागणी करणाऱ्या लाचखोर अभियंत्याला रंगेहाथ पकडण्यात आले, आज दुपारच्या वेळेत सिंचाई विभागाच्या कार्यालयातच एसीबीने ही कारवाई केली.राजेश चिमुरकर असे लाचखोर आधिकार्याचे नाव असून अशा पध्दतीची त्याच्यावर दुसऱ्यांदा कारवाई करण्यात आली. चेकलिखितवाडा येथील एका शेतकर्याला सिंचन विहीर मंजूर झाली. त्याने नियमानुसार टप्प्याटप्याने विहीरीचे, बांधकाम केले. विहीरीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याने अंतिम बिल मिळविण्यासाठी रितसर प्रक्रिया पुर्ण केली. मात्र गोंडपिपरी शाखा अभियंता राजेश मारोतराव चिमुरकर यांनी बिल देण्यासाठी चार हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली.शेतकऱ्याला लाच द्यायची मुळीच इच्छा नव्हती. यामुळे त्याने यबाबतची तक्रार एसीबीकडे दाखल केली.

एसीबीने पळताळणी केली असता या प्रकाराची सत्त्यता पटली. यानुसार आज एसीबीच्या पथकाने गोंडपिपरीच्या उपविभागीय सिंचाई विभागात सापळा रचला आणि 4 हजार रूपयाची लाच घेतांना अभियंता राजेश चिमुरकर याला रंगेहाथ पकडले.