23.9 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home गुन्हेवार्ता एकाच कुटुंबातील चार जणांवर प्राणघातक हल्ला

एकाच कुटुंबातील चार जणांवर प्राणघातक हल्ला

0
23

मोहाडी ,दि.24ः-एकाच कुटुंबातील चारजणांवर धारदार शस्त्राने वार करून जखमी केल्याची घटना रोहणा येथे रविवारी  १0.२५ वाजताच्या सुमारास घडली.
नरहरी वडगू गुड्डे (३८) असे आरोपीचे नाव असून दर्शन ताबोता केवट, लहू दर्शन केवट, शिवलाल दर्शन केवट, पुस्तकला दर्शन केवट अशी गंभीर जखमीची नावे आहेत.
नरहरी गुड्डे याने जादुटोण्याच्या संशयावरून केवट कुटुंबियांवर धारदार शस्त्राने सपासप वार करून रक्तबंबाळ केले. जखमींना उपचारार्थ ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे दाखल केले असता डॉक्टरांनी भंडारा येथे रेफर करण्याचा सल्ला दिला. जखमींवर भंडारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोहाडी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.