24.6 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home गुन्हेवार्ता पत्नीची हत्या करून पतीनेही घेतला गळफास

पत्नीची हत्या करून पतीनेही घेतला गळफास

0
18

अहेरी,दि.05ः कौटुंबिक कलहातून पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना (दि.४) सकाळी तालुक्यातील आलापल्ली येथील विलिवर्स चर्चमध्ये उघडकीस आली. मोनिका संजय भोगेवार (२४) व संजय समय्या भोगेवार(२८) अशी मृत पत्नी व पतीची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, आलापल्ली येथील मन्नेवार मोहल्ल्यात संजय भोगेवार हा आपली पत्नी मोनिका व दीड वर्षीय मुलासह वास्तव्य करीत होता. त्यांनी ख्रिश्‍चन धर्म स्वीकारला होता. पत्नीची प्रकृती बरी नसल्याने काल रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास दोघेही गोंड मोहल्ल्यातील बिलिवर्स चर्चमध्ये आले. तेथे प्रार्थना व पूजा-अर्चा केल्यानंतर फादर दुसर्‍या खोलीत झोपायला गेले, तर संजय व मोनिका एकत्र झोपले. आज सकाळी काही मंडळी चर्चमध्ये गेली असता, त्यांना संजय व पत्ील मोनिका हे दोघेही मृतावस्थेत आढळून आले. सदर घटनेची माहिती अहेरी पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास अहेरीचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर करीत आहेत.