खोटे दस्तऐवजावरून फसवणूक; ६ जणांवर गुन्हा दाखल

0
11

गोंदिया,दि.25: कृषी उत्पन्न बाजार समिती फियार्दी प्रभारी सचिव एस.एस. जोशी यांची खोटी स्वाक्षरी करून व बनावटी दस्तऐवज तयार करून आरोपींनी जनता सहकारी बँकेत सादर करून १ लाख रुपये लोन उचल करून फसवणूक केली आहे. ही घटना १0 ते १४ ऑगस्ट २0१८ पयर्ंतची आहे.
आरोपी योगेश आमकर (३१) रा. श्रीनगर, सचिन उपवंशी (२६) रा. बाजार चौक गोंदिया, नितेश यादव (३0) रा. मालवीय वॉर्ड गोंदिया, राहुल मेश्राम (२८) रा. सिव्हिल लाईन, आदित्य चव्हान (२६) रा. फुलचूर, अजय सहारे (५१) रा. कुडवा यांनी संगनमताने बनावटी दस्तऐवज तयार केले. तसेच कृउबासचे प्रभारी सचिव जोशी यांची खोटी स्वाक्षरी करून तयार केलेले दस्तऐवज जनता सहकारी बँकेत सादर करून खरे असल्याचे सांगून १ लाखाच्या कर्जाची उचल केली. तक्रारीवरून आरोपींविरुद्ध संबंधित ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक नार्वेकर करीत आहेत.