25.7 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home गुन्हेवार्ता कामगार नेते वासनिक यांच्यावर प्राणघातक हल्ला

कामगार नेते वासनिक यांच्यावर प्राणघातक हल्ला

0
28

भंडारा ,दि.27ः- वरठी येथील सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीचे कामगार नेते मिलिंद वासनिक यांच्यावर शनिवारी रात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला. सदर घटना कारधा पुलावर घडली. लोखंडी रॉड व धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला असून यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. त्यांच्यावर भंडारा येथे खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहे.
सध्या सनफलॅग कंपनीत कामगार संघटना निवडणुकीची धामधूम सुरू आहे. कंपनीतील काम आटोपून संघटनात्मक सभा घेऊन मिलिंद वासनिक चारचाकी वाहनाने कारधा येथे स्वगृही जात होते. दरम्यान कारधा पुलावर एका चार चाकी वाहनाने धडक दिली. यावरून गाडी चालकाला जाब विचारला असता त्यांच्यासोबत हुज्जत घातली. धडक देऊनही अरेरावी वाहन चालक व त्याच्या सहकार्यांनी मिलिंद वासनिक यांच्यावर लोखंडी रॉड व शस्त्राने हल्ला चढवला. मारहाणीत त्यांना डोक्याला जबर दुखापत झाली आहे.
हल्लेखोरांनी मिलिंद वासनिक यांना नदीत फेकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान विरुद्ध दिशेने येणारे वाहन दिसल्याने त्यांना मृत समजून पसार झाले.