ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या विद्यार्थ्यांकडून आपदाग्रस्तांसाठी निधी संकलन

0
9

गोंदिया,दि.27ः- ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने केरळ राज्यात आलेल्या भीषण पुरामध्ये संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत करण्याच्या उद्देशाने मदत निधीचे संकलन करण्यात आले.
केरळ येथील आलेल्या भीषण पुरामुळे मानवी जीवन धोक्यात सापडले होते. पुरामुळे अनेक ठिकाणी नेस्तानाभूत झाले असून नागरिकांना आपल्या घरदार सोडून पलायन करावे लागले. यामुळे केरळ येथे नैसर्गिक आपत्तीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तेथील नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने मदतनिधी संकलित करण्यासाठी भाकपा सचिव मिलिंद गणवीर यांच्या मार्गदर्शनात अभियान राबविण्यात आला. अभियानात संघटनेचे अँड.अमित उके, भाकपचे रामचंद्र पाटील, राकेश हिरडे, प्रल्हाद उके, अमित बंसोड, धर्मेंद्र गजभिये, रवि हरीणखेडे, रविकांत उके, निखिल कटरे, अश्‍विन शहारे, महेंद्र हरीणखेडे, संदिप हरीणखेडे, आशिष राऊत, माणिक हरीणखेडे आदिसह मोठ्या संख्येत पदाधिकार्‍यांनी सहभाग घेवून केरळ येथील आपदग्रस्तांसाठी निधी संकलीत केली.
या अभियानाला नागरिकांनी प्रतिसाद देत आपआपल्या परीने मदत दिली. दरम्यान सदर निधीही केरळ येथील उदध्वस्त झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी पाठविण्यात येणार आहे.