29.1 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home गुन्हेवार्ता असरअल्ली पोलिसांनी केला मोहफुलाचा सडावा नष्ट

असरअल्ली पोलिसांनी केला मोहफुलाचा सडावा नष्ट

0
43

सिरोंचा,दि.12ः- तालुक्यातील असरअली पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या कोत्तापल्ली गावात पोलिसांनी धाड टाकून अंदाजे एक ते दीड लाखांचा मोहाच्या फुलांचा सडवा नष्ट केला.
जिल्ह्यात दारूबंदी असतानाही जिल्ह्यातील अनेक भागात आजही वेगवेगळ्या प्रकारची दारू मोठय़ा प्रमाणात विकली जाते. त्यातही मोहाची दारू काढण्याचे प्रमाण अधिक आहे. गावांमध्ये अनेक दारू विक्रेते मोठ मोठय़ा ड्रममध्ये मोहाची फुले सडवत ठेवतात व नंतर त्याची दारू काढून दारूची विक्री करतात. गावांमध्ये अशा रितीने अवैध दारू विक्रीवर आळा घालण्यासाठी पोलिस गुप्त माहितीच्या आधारे सडवत ठेवलेल्या मोहाची माहिती मिळवून त्यावर कारवाई करतात.
अशाच प्रकारे असरअली पोलिस स्टेशनचे ठाणेदार रामेश्‍वर दराडे व त्यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी कोत्तापल्ली गावात धाड टाकून गावातील दारू काढण्यासाठी लपवण्यात आलेला मोहाचा सडवा शोधून तो नष्ट केला व धाडीत सापडलेल्या प्लॉस्टीक ड्रमसह साहित्याची होळी केली. जवळपास एक ते दीड लाखाचा सडवा या कारवाईत कष्ट करण्यात आला.

 

blank