ओबीसी संघर्ष कृती समितीची गुरुवारला कोजागिरी

0
7

गोंदिया,दि.23: ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने येथील शास्त्री वॉर्डातील डॉ. रुपसेन बघेले यांच्या निवासस्थानासमोर शरद पोर्णिमा उत्सव व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार (दि.२५) रात्री ७ वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओबीसी कृती संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे राहणार आहेत.
तर मार्गदर्शक म्हणून महासचिव मनोज मेंढे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सहसचिव खेमेंद्र कटरे, प्रा. रामलाल गहाणे, शास्त्री वार्ड संघटनेचे अध्यक्ष खुशाल कटरे, नगरसेविका मालती कापसे, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष सविता बेदरकर, एल.यू.खोब्रागडे, एस.यू.वंंजारी, डॉ. रुपसेन बघेले, सरपंच विमल तावाडे,सावन डोये,प्रा.संजिव रहागंडाले,शिशिर कटरे,चंद्रकुमार बहेकार,महेंद्र बिसेन,भरत पाटील,प्रा.तरोणे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कैलास भेलावे, सुनील भोंगाडे, राजेश कापसे, रवि भांडारकर, संतोष वैद्य, प्रेम साठवणे, राहूल खोब्रागडे, रोहित चौधरी, ओमेंद्र पारधी, बंडू चौधरी, निलू यादव, सोनू पारधी, संजू पटले, राजू भोंगाडे, आशिष वंजारी, संदीप पाटील आqदनी केले आहे.