लग्नाचे आमिष देऊन युवतीची फसवणूक

0
12

तिरोडा,दि.27 : तिरोडा पोलीस स्टेशन अंतर्गत ग्राम आलेझरी येथील विवाहित आदिवासी युवतीस ‘मी तुझ्यावर प्रेम करतो व तुझ्याशी लग्न करीन’ असे आमिष देऊन तिच्याशी इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून युवती गर्भवती झाल्यावर तो मी नव्हेच अशी भूमिका घेणाऱ्या युवकाविरुद्ध पीडित युवतीच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.तिरोडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आलेझरी येथील पीडित २२ वर्षीय युवतीचा विवाह झाला असून मागील वर्षी पतीशी बेबनाव झाल्याने माहेरी येऊन राहात होती. ऑगस्ट २०१७ पासून गावातीलच कंठीलाल जीवन कटरे (२३) याने तिच्याशी जवळीक साधून ती विवाहित युवती आदिवासी समाजाची असल्याचे माहीत असतानाही ‘मी तुझ्यावर प्रेम करतो व तुझ्याशीच लग्न करीन’ असे बोलून ऑगस्ट २०१७ पासून मे २०१८ पर्यंत अनेकदा तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने ती सात महिन्याची गर्भवती असून आता तो मी नव्हेच अशी भूमिका युवकाने घेतल्याने पीडित युवतीने २५ ऑक्टोबर रोजी तिरोडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून भादंवि कलम ३७६ (२) (ब) ४१७ व अनुसूचित जाती जमाती कायदा कलम ३ (१) (व)(२) नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करीत आहेत.