नव्या कृउबासमध्ये भाजी बाजार निर्मितीचा मार्ग मोकळा

0
12

गोंदिया,दि.27 :  नव्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नव्या भाजी बाजाराच्या निर्मितीसाठी होकार देत राज्य शासनाच्या मुख्य सचिवांना अंतिम आदेशासाठी फाइल पाठविण्याचे निर्देश आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या विनंतीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. त्यासोबतच पणन व सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्माण कार्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता गोंदियात मुंबईच्या कॉफैट मार्केटनुसार अत्याधुनिक भाजी मार्केटसारखा अत्याधुनिक भाजी मार्केट निर्माणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीला नव्या मार्केट यार्डमध्ये स्थानांतरित करण्यात आले. तसेच राज्य शासनाकडे विनंती करून नव्या मार्केट यार्ड भाजी बाजाराच्या निर्मितीसाठी ४ कोटी रुपयाचा निधी शासनाने नोव्हेंबर २०१७ मंजूर केला होता. नवीन भाजीबाजार अत्याधुनिक बनविण्यासाठी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या निर्देशावरून कृउबासच्या संचालकांना नागपूर जिल्ह्यातील कृषी उपज मंडी पाहण्यासाठी व उपलब्ध सुविधांची माहिती घेण्यासाठी पाठविण्यात आले होते. सोबतच भाजी बाजार निर्मितीचे विशेतज्ञ प्रसिद्ध वास्तुविशारद संघी यांच्याद्वारा निर्माण कार्याची योजना प्लॅन, नकाशा व खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. ज्याची लागत ७ कोटी १५ लाख रू पये आहे. मागील अनेक वर्षापासून आमदार गोपालदास अग्रवाल यांनी शहराच्या रस्त्यांवर सुरू असलेल्या भाजी व फळ मार्केटला मुंबईच्या कॉफैट मार्केटसारखी व्यवस्थित व स्वच्छ बनविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास व भाजी तथा फळ विक्रेत्यांना चांगली सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल अनेकांनी त्यांचे आभार मानले.