26.1 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home गुन्हेवार्ता ग्रामसेविकेला डांबले ग्रामपंचायत कार्यालयात

ग्रामसेविकेला डांबले ग्रामपंचायत कार्यालयात

0
17

साकोली,दि.21ः-ग्रामसभेत गदारोळ घालून ग्रामसेविकेला शिविगाळ करून ग्रामपंचायत कार्यालयात डांबल्याची घटना विहीरगाव (बुराड्या) ग्रामपंचायत येथे सोमवारी घडली.
ग्रामसभा सुरू असताना आरोपी नवृत्तीनाथ सुरेश उपरीकर (२६), मुरलीधर दुधराम बनकर (३६), मनोहर नारायण इटवले (४0), विलास बाळकृष्ण बनकर, मिनाक्षी राजकुमार इटवले (४५) यांनी गदारोळ घालून ग्रामसेविका संगीता वसंत मारवाडे (३५) यांना अलि शिविगाळकेली. तसेच त्यांच्याजवळ शासकीय दस्ताऐवज हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात डांबून सरपंच रविंद्र मोहन खंडाळकर व ग्रामसेविकेला जिवे मारण्याची धमकी दिली. शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याने साकोली पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डहाके करीत आहेत.