26.1 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ खर्रा-गुटखा थूंकणार्‍यांची गय करणार नाही-दयानिधी

खर्रा-गुटखा थूंकणार्‍यांची गय करणार नाही-दयानिधी

0
23

गोंदिया,दि.20ः- प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसर्‍या शनिवारी जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात येते. केवळ परिसर स्वच्छता करून चालणार नाही, तर आपल्या वर्तणूकीत बदल घडविण्याची गरज व्यक्त करून कार्यालयात खर्रा, गुटखा खावू नये. यापुढे खर्रा-गुटखा खाऊन भिंती रंगविणार्‍यांची गय केली जाणार नसल्याचा सज्जड दम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिला.
वसंतराव नाईक जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत परिसरात १८ नोव्हेंबर रोजी आयोजित स्वच्छता मोहिम अंतर्गत कर्मचार्‍यांशी संवाद साधताना ते बोलत होते. मुख्य लेखा व वित्त अधिकारी अनंत मडावी, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके, जिल्हा पशुधन विकास अधिकारी डॉ. राजेश वासनिक यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषद परिसरात कर्मचार्‍यांच्या सहकार्यातून परिसर स्वच्छ करण्यात आला.
यात जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत परिसरात कार्यरत सर्वच विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते. १५ सप्टेंबर पासून जि.प. प्रशासकीय इमारत परिसरात प्रत्येक महिन्याच्या महिन्याच्या पहिल्या व तिसर्‍या शनिवारी स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. स्वच्छतेला टीकऊन ठेवण्यासाठी प्रत्येक कर्मचार्‍यांच्या सहकार्याची गरज आहे. कचराकुंडीतच कचरा टाकावा, आपले कार्यासन, आपले कार्यालय व परिसर सुद्धा स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सहकार्य करण्याचे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड यांनी केले.
दरम्यान त्यांनी स्वच्छता विभागांतर्गत राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांची तथा जागतिक शौचालय दिनाची माहिती सुद्धा दिली. पूर्वी अनेक व्यक्ती कचरा कुठेही टाकत होतो. मात्र, स्वच्छतेतील जाणीव जागृतीमुळे आता इतरत्र पडणार्‍या कचर्‍याचे प्रमाण कमी झाले. लोकांमध्ये जागृती आण्यासोबतच आपणही कचर्‍याचे योग्य व्यवस्थापन करण्यास शिकण्याची गरज डॉ. राजेश वासनिक यांनी मनोगत व्यक्त केली.
कार्यक्रमाचे संचालन करून माहिती, शिक्षण व संवाद तज्ज्ञ अतुल गजभिये यांनी जि.प. प्रशासकीय इमारत परिसरात इतरत्र टाकण्यात येणार्‍या कचर्‍या संदर्भातील चित्रफितीचे सादरीकरण केले. याप्रसंगी सर्वच कर्मचार्‍यांनी जिल्हा परिषद परिसरात स्वच्छता अभियानात सहभाग घेऊन परिसर स्वच्छ केला.