25.3 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home गुन्हेवार्ता प्रेमीयुगुलाचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

प्रेमीयुगुलाचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

0
35

गडचिरोली,दि.21ः-कुटुंबीयांना लग्नास नकार दिल्याने दोन्ही प्रमीयुगुलानी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना धानोरा तालुक्यातील सालेभट्टी व पवणी येथे काल सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. ज्ञानेश्‍वर केशव शेंडे (२६) रा. सालेभट्टी व नवृत्ता साहांगू मडावी (२0) अशी आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या प्रेमीयुगुलांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार सालेभट्टी येथील ज्ञानेश्‍वर शेंडे व पवणी येथील नवृता मडावी यांचे मागील एक वर्षापासून एकमेकावर प्रेम होते. दोघांनी लग्णाच्या आणाभाका घेऊन सुखी सुराची स्वप्ने रंगविली होती. परंतु मुलीकडील मंडळींना ते मान्य नव्हते. कुटुंबीयांनी त्या दोघांचीही समजूत घातल्याने त्या लग्न न करण्याचे दोघांनीसुद्धा मान्य केले. मात्र काल मुलीचे वडील लग्णासाठी दुसरा मुलगा बघण्यासाठी बाहेर गावी गेले होते. ही बाबत ज्ञानेश्‍वर व नवृत्ता यांच्या लक्षात येताच त्यांना एकमेकापासून दूर राहणे अशक्य झाल्याने दोघांनीही आत्महत्येचा मार्ग स्वीकारून काल सायंकाळच्या सुमारास फवारणी करिता असलेला डीएपी नामक (डास प्रतींधक पावडर) प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पावडरचे पाणी पिल्यानंतर ज्ञानेश्‍वर हा आपल्या स्वगावी दुचाकीने सालेभट्टी येथे आला व खाली कोसळल्या. ही बाबत त्याच्या मोठय़ा भावाच्या लक्षात येताच त्यांनी गावातील इतरांची मदत घेऊन ज्ञानेश्‍वरला धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्याच्यावर उपचार करण्यात आला. परंतु प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी रात्री ११ वाजता गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे हलविण्यात आले. मुलीलाही रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तिच्या उपचार केल्याने मुलीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती आहे. परंतु ज्ञानेश्‍वरची प्रकृती धोकादायक असल्याने त्याला दुसर्‍यादिवशी चंद्रपूरला हलविण्यात आले.
ज्ञानेश्‍वर याला आई-वडील नाही फक्त मोठा भाऊ आहे. ज्ञोनश्‍वरच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी प्रार्थना सालेभट्टी येथील नागरीक करीत आहेत. ज्ञानेश्‍वर हा सालेभट्टी येथील ग्रामपंचायतीत चपराशी पदावर कार्यरत आहे.