साक्षगंधापूर्वीच पल्लवीचा अपघातात मृत्यू

0
12

भंडारा,दि.21 :- भरधाव वेगात असलेल्या ट्रक चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक हयगयीने चालवत स्कुटीला धडक दिल्याने स्कुटीचालक तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारला राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर पटवारी भवन जवळ घडली. मृतक तरुणीचे नाव पल्लवी विजय भोयर (२४) मु. बेला असे आहे. ती गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा पोष्ट ऑफिसमध्ये कार्यरत होती. विशेष म्हणजे पल्लवीचा साक्षगंध १० फेब्रुवारी रोजी होणार होता.

तिचे साक्षगंध १० फेब्रुवारी रोजी असल्याने ती कुटूंबियांसोबत भंडारा येथे कार्यक्रमासंबधी साहित्य खरेदी करण्यासाठी आली होती. सामान घेवून बेला येथे स्कुटी क्र. एमएच ३६ सी ३८० ने बेला येथे परत जात असतांना मागेहून येणाèया ट्रक क्र. एमएच ३१ सीबी २३९० च्या चालकाने तिला धडक दिली. यात पल्लवी ही गंभीर जखमी तिला. तिला नागरीकांच्या मदतीने सामान्य रुग्णालय भंडारा येथे नेण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पल्लवी हिचे शिक्षण बी. एससी. पर्यंत झाले होते. ती तिरोडा येथे पोष्ट ऑफिसमध्ये नोकरीवर होती. साक्षगंधापूर्वीचे तिच्या काळाने घात घेल्याने गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. अपघातानंतर ट्रक चालकाने स्वतःहून भंडारा पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले. पुढील तपास भंडारा पोलीस करीत