24.9 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home गुन्हेवार्ता आलेवाडा परिसरात कारच्या अपघातात एकाचा मृत्यू

आलेवाडा परिसरात कारच्या अपघातात एकाचा मृत्यू

0
23

देवरी,दि.०९ःतालुक्यातील चिचगड परिसरातील आलेवाडा गावाजवळ झालेल्या चारचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज ९ फेबुवारीला घडली.मृतक शिक्षक असून विरेंद्र रहागंडाले (वय २६) असे त्यांचे नाव आहे.रहागंडाले यांचे त्यांच्या अल्टो या चारचाकी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन झाडाला जाऊन आढळले यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.वाहनाचेही यात मोठे नुकसान झाले आहे.त्यांच्यासोबत असलेले शिक्षक महेश रहागंडाले(वय ४०) यांनाही गंभीर दुखापत झाली आहे.चिचगडचे पोलिस निरिक्षक नागेश भाष्कर यांनी घटनास्थळी पोचून जखमीला उपचारासाठी रुग्णालयात हलविले.