कर्जाच्या नावावर शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यां टोळीचे सदस्य ताब्यात

0
13

गोंदिया,दि.14 : कर्ज देण्याच्या नावावर  शेतकºयांना लुबाडणाºया पाच पैकी तिघांना आमगाव पोलिसांनी सोमवारी अटक केली. यातील दोन आरोपी फरार आहेत. प्रथम तक्रारीत २ लाख ८० हजारांनी फसवणूक झाल्याचे म्हटले असले तरी संपूर्ण चौकशी झाल्यावर कोट्यवधी रुपयाने फसवणूक झाल्याचे उघडकीस येण्याची शक्यता आहे.विवेद्र दसाराम वाटकर(मोहाडी,ता,खैरलांजी,जि.बालाघाट) उर्फ विवेक तिवारी,मिनेंद्र प्रेमलाल बागडे(रा.रामपायली,जि.बालाघाट),बंसत वनवास राऊत(पिपरी,तुुमसर,जि.भंडारा) यांना ९ फेब्रुवारीला अटक करण्यात आली. तर लोकेश चव्हाण व शुभम शरणागत हे दोघे फरार आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने १६ फेबुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे

रिसामा येथील सुरज कवडू वाढई (२१) यांनी आमगाव पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी मानसी कंन्सल्टसी प्रायव्हेट लिमीटेड कंपनीच्या नावाने ४५ दिवसात कर्ज मंजूर करू देतो कर्जाकरीता अनामत रक्कम म्हणून ४ हजार ५०० रूपये घेण्यात आले. आरोपींनी यासाठी एजंट सुध्दा नेमले. परंतु त्या एजंटनी लोकांकडून पैसे वसूल करून त्या कंपनीच्या संचालकांना दिले. मे २०१८ ते ८ फेब्रुवारी २०१९ या काळात मानसी कंन्सल्टसी प्रायव्हेट लिमीटेड कंपनीच्या नावावर २ लाख ८० हजार ५०० रूपये ७३ शेतकºयांकडून घेण्यात आले. परंतु ४५ दिवस लोटूनही कुणालाही कर्ज मंजूर केले नाही. मानसी कंन्सल्टसी प्रायव्हेट लिमीटेड कंपनीच्या नावाने बनावट ओळखपत्र तयार करून नोकरी लावून देण्याच्या नावावरही तयार केलेल्या एजंटची फसवणूक करण्यात आली. आमगाव व सालेकसा या दोन तालुक्यात मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे.आमगाव पोलिसांनी आरोपीविरूध्द भादंविच्या कलम ४२०, ४६५, ४६७, ४७१, १२० ब, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.ही कारवाई पोलिस निरिक्षक दिनकर ठोसरे,सपोनी रमेश गर्जे,प्रमोद बघेले,प्रदिप अतुलकर,कर्मचारी गोपाल कापगते,लिलेंद्रंसिह बैस,विजय रहागंडाले,सुखदेव राऊत,चंद्रकात कर्पे,भुवनलाल देशमुख,मधृकर कृपाण,राजकुमार पाचे,तुलसीदास लुटे,रेखलाल गौतम,विनय शेंडे,,मुरली पांडे,विनोद गौतम,पकंज खरबडे यांच्या पथकाने केली आहे.