कॅसीनो सेंटरवरील धाडीत ३२ आरोपींना अटक १० लाखाचा मुद्देमाल जप्त

0
10

गोंदिया,दि.१४ः- गोंदिया शहरातील विविध भागात चालत असलेल्या अवैध कॅसिनोसेंटरवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १२ फेबुवारीला एकासोबत धाड घालून ३२ आरोपींना अटक करीत त्यांच्याकडून ९ लाख ७२ हजार ४२६ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणात १० गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.विशिष्ट आयडी पुरवून त्या आयडीच्या पैशाच्या प्रमाणात पाँईटस जमा करुन जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती पोलीस विभागाला मिळाली होती.त्यानुसार ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस निरिक्षक दिनकर ठोसरे यांच्या नेतृत्वात केली.या कारवाईत २५ संगणक संच,२२ व्हिडीओ गेम,३ मोबाईल फोन,रोख ७६ हजार ८२१ रुपये असा ९ लाख ७२ हजार ४२६ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.या कारवाईमध्ये ६ गुन्हे गोंदिया शहर व ४ गुन्हे रामनगर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले आहेत.या कारवाईसाठी ८ सहाय्यक पोलीस निरिक्षक,५ पोलीस उपनिरिक्षक व २८ कर्मचारी यांची मदत घेण्यात आली होती.
तसेच घरफोडी.चोरी व इतर मालमत्तेच्या गुन्ह्याच्या प्रकरणात केलेल्या कारवाईमध्ये १३ प्रकरणातील १४ आरोपींना अटक करुन १ लाख १६ हजार ६९० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तर जुगार कायद्यानुसार २५ आरोपींना अटक करुन ४ लाख २ हजार ५१५ रुपये,मोटार वाहन कायद्यानुसार ६९ केसेस करुन ११ हजार १०० रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे.वारंटमधील ११ आरोपींना अटक करुन ५१ आरोपींना समंस बजावण्याची कारवाई ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक हरिष बैजल यांनी दिली आहे.