25.2 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home गुन्हेवार्ता विहिरीत आढळले नवजात अर्भक

विहिरीत आढळले नवजात अर्भक

0
36

देसाईगंज,दि.20ःः तालुक्यातील कुरुड येथील एका पडीक विहिरीत नवजात अर्भक मृतावस्थेत आढळल्याने खळबळ माजली आहे.कुरुड-कोंढाळा रस्त्यावर एक विहीर असून, ती बुजलेली आहे. आज काही नागरिकांना विहिरीत नवजात अर्भक दिसल्यानंतर वार्ता गावात पसरली. काही वेळाने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतावस्थेतील अर्भक ताब्यात घेतले. अर्भक मुलगी असून, त्यामुळेच ते फेकण्यात आले की, अनैतिक संबंधातून जन्म झाल्याने तिला फेकून देण्यात आले, याबाबत परिसरात चर्चेला पेव फुटले आहे.