30.2 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home गुन्हेवार्ता चिंचोली (बु) येथील शेतकर्‍याची आत्महत्या

चिंचोली (बु) येथील शेतकर्‍याची आत्महत्या

0
32
 ब्रम्हपूरी, ,दि. ३०  –तालुक्यातील चिंचोली (बु) येथील शेतकर्‍याने राहत्या घरी कीटकनाशक औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना दि. २९ जानेवारी बुधवारला उघडकीस आली आहे.
मृतक इसमाचे नाव देवेंद्र खुशाब दिवटे (४१) असून मृतकाने पहाटे चार वाजता घरीच विषारी औषध प्राशन केले. कुटुंबियांना बाथरूममध्ये विषारी औषधीचा वास येऊ लागल्याने त्यांनी तात्काळ मृतकाची विचारपूस केली आणि त्याच्या तोंडातून वास येत असल्याने लगेच ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने तात्काळ गडचिरोली येथे हलविण्याचा सल्ला ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला त्यांनतर मृतकाला गडचिरोली येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे पोहचताच डॉक्टरांनी तपासून सदर इसमाला मृत घोषित केले मृतकाच्या पश्यात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा आप्तपरीवार असून कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.