24.9 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home गुन्हेवार्ता अवैध दारूसह ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारूसह ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
1632

तिरोडा,दि.21 : कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी संचारबंदी लागू आहे. या काळात पोलिस प्रशासन अहोरात्र परिश्रम घेत आहे. त्या अनुषंगाने पोलिसाच्या पथकाने गश्त दरम्यान वाहनाची तपासणी केली असता वाहनात दारूसह ४ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई केली. गश्त दरम्यान वाहन क्र. एमएच. ३५/पी. ३१७६ किंमत ४ लाख रुपयेमध्ये ७ हजार ८२० रुपयांची दारू अवैधरित्या नेत असतांना मिळून आली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. मोतीलाल मरसकोल्हे, प्रकाश सिरसे, अमित गोस्वामी, मोहित चौधरी आदींनी पार पाडली. आरोपी संगीता बारचे मालक अश्विनी जायस्वाल यांच्या विरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र दारू बंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे. तर रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत झिलमिली येथे अभय आनंदराव रामटेके यांच्या घराची झडती घेतली असता २० लिटर हाथभट्टी दारू किंमत २००० रु. मिळून आली. संचारबंदीचे उल्लंघन केल्या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे