सालेकसा,दि.22 : सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत कारुटोला येथील देशी दारूच्या दुकानातून ७२ हजार रुपयांची दारू चोरी गेली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी सापडा रडून चोरीस गेलेल्या दारूसह आरोपीला ताब्यात घेतले.
सविस्तर असे की, १७ ते १८ मार्चच्या दौरान अज्ञात आरोपी ने कारुटोला येथील देशी दारूचे दुकान फोडून दुकानातून २५ पेट्या देशी दारू, ७ पेट्या सेवन स्टार असा एकूण ७२ हजार रुपयांचा माल चोरून नेला होता. या बाबतची तक्रार फिर्यादी तेजलाल दुर्गा कटरे (३६) रा. भनसुला पो. धानोली यांनी केली होती. तक्रारीच्या आधारावर पोलिस निरिक्षक राजकुमार डुणगे यांनी पथक तयार करून तपास यंत्रणा कामाला लावली. गुप्त माहितीच्या आधारे आरोपी राहुल अशोक मेहर (२५) रा. साखरीटोला याला ताब्यात घेतले असता त्याने १६ पेट्या व ८ पव्वे देशी दारू तसेच ४ पेट्या सेवनस्टार असा एकूण ४५ हजार ५७६ रुपयाचा माल जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार डुणगे, पोउपनि. ओमप्रकाश कावळे, सपो. बडवाईक, पो.ना. विजेंद्र बिसेन, दिपक रहांगडाले आदींनी पार पाडली.





