25.8 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home गुन्हेवार्ता मुलानेच कापलं वडिलांचं गुप्तांग, गळ्याचा चावा घेत निर्घृण हत्या

मुलानेच कापलं वडिलांचं गुप्तांग, गळ्याचा चावा घेत निर्घृण हत्या

0
1108

नागपूर,दि.27ः- हुडकेश्वर भागातील एका २५ वर्षीय तरुणाकडून वडिलांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारला समोर आली आहे. मुलाने वडिलांच्या गळ्याचा जोरात चावा घेत नंतर चाकूच्या सहाय्याने गुप्तांग कापल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

विक्रांत पिल्लेवार असे या आरोपीचे नाव आहे. आरोपी विक्रांत प्रचंड हिंसक झाला असल्याने त्याच्यावर नियंत्रण मिळवताना पोलिसांना खूप प्रयत्न करावे लागले अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. “कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार कोणतेही कारण नसताना विक्रांत हिंसक झाला होता. त्याने त्याच्या वडिलांच्या गळ्याचा इतक्या जोरात चावा घेतला की रक्त येऊ लागले होते. यानंतर त्याने वडिलांना ओढत नेले आणि गुप्तांग कापले. तिथेच घटनास्थळी त्यांचा मृत्यू झाला,” असे पोलीस निरीक्षक राजकमल वाघमारे यांनी सांगितले.“विक्रांत हा एक जीम ट्रेनर होता.आई आणि बहिणीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांनाही धमकावले.