गोंदिया,दि.03- सडक अर्जुनी तालुक्यातील किसनपुर/सितेपार निवासी छगन वाघाडे (58 वर्ष) हा आपल्या शेतातील झाडावर आज 3 मे रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास चढलेला असतानाच झाडाला लागून गेलेल्या 11 केव्ही हाईटेंशन विजेचा तारांना स्पर्श होऊन झाडावरच विजेच्या धक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.घटनेची माहिती मिळताच कुटुंबातील सदस्यांनी डुग्गीपार पोलीस ठाण्यास माहिती दिली.पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले.




