23.9 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home गुन्हेवार्ता खुर्शीपारजवळील दोन ट्रकच्या धडकेत 19 कामगार जखमी

खुर्शीपारजवळील दोन ट्रकच्या धडकेत 19 कामगार जखमी

0
428
गोंदिया,दि.08ः- जिल्ह्यातून जाणार्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरीला खुर्शीपार गावाजवळ 7 मे च्या रात्री 1 वाजेच्या सुमारास दोन ट्रकमध्ये झालेल्या आमोरासमोरील अपघातात 19 कामगार जखमी झाल्याची घटना घडली.देवरी पोलीस ठाणेंतर्गत ही घटना घडली असून हैद्राबादवरुन छत्तीसगडला जाणार्या ट्रकला एका दुसर्या ट्रकने धडक दिल्याने हा अपघात घडला.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादि ट्रक चालक जगमोहन जलेश्वर गोप (वय 28,निवासी किजुरटोल, जिला रांची,झारखंड) हा ट्रक क्रमांक सीजी 04-जेडी 9973 ने हैदराबादवरुन छत्तीसगढ़ला जात होता.या ट्रकमध्ये काही कामगार बसले होते जे छत्तीसगडला चालले होते.जेवण करण्याकरीता राष्ट्रीयमहामार्गावरील खुर्शीपार जवळ रस्त्याच्या कडेला ट्रक थांबवित असतानाच मागून आलेल्या ट्रक क्रमांक एमएच 15, टीव्ही 6177 ने जोरदार धडक दिली.धडक दिल्यानंतर सदर ट्रक चालकाने ट्रक न थांबविताच फरार झाला. या घटनेत जखमी झालेल्या कामगारामध्ये १) हरिष नेपालदास खुरे ४० वर्ष, (२)रमेश भिम इतलहरे २८ वर्ष , (३) आनंद नारायण शाहु १५ वर्ष , (४) ओमप्रकाश शाहु २२ वर्ष (५) संदिप हरी खुरे १९ वर्ष, (६) भवानीसिंग लिलाकुशव टंडन ३० वर्ष, (७), सौ.प्रेमकुमारी नितु डहरिया ३५ वर्ष,  (८) राजेश भिम इतलहरे २२ वर्ष, (९) अनिल दिलीप बंजारे २४ वर्ष, (१०) अनुज दिलीप बंजारे ३४ वर्ष, (११) नरेन्द्र मनुशाहु ३५ वर्ष, (१२) विजय मोहरलाल शाहु २९ वर्ष, (१३) भुपेन्द्र उदास खुरे २३ वर्ष, (१४) राजकुमारी रोहीत गेंदले ३० वर्ष, (१५) भिलारी रामाशंकर लहरे ३० वर्ष, १६) रामाशंकर लहरे ३४ वर्ष, १७) भानुप्रताप भिषन महीपाल १७ वर्ष, (१८) भिषन महीपाल ४० वर्ष, (१९) रोहीत कुणाल ४० वर्ष सर्स राहणार छ्त्तीसगड यांचा समावेश आहे.पोलिसांनी याप्रकरणात कलम २७९,३३७, ३३८ भादवी, सहकलम १३४,१८४ मोवाका अन्वये  गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहवा कावळे करीत आहेत.