25.2 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home गुन्हेवार्ता देशी कट्यासह काडतुस बाळगणार्यास अटक

देशी कट्यासह काडतुस बाळगणार्यास अटक

0
605
गोंदिया,दि.12 मेः- जिल्ह्यातील केशोरी पोलीस ठाणेंतर्गत एका अज्ञात इसमाकडून देशी कट्टा व 10 जिवंत काडतुस जप्त करण्यात आल्याची घटना 10 मे रोजी समोर आली.सदर व्यक्तीला केशोरी पोलिसांनी संशयास्पदरित्या हालचाल करीत फिरतांना ताब्यात घेतले असता त्याच्याकडे देशी कट्टा आढळून आला.विशेष म्हणजे दोन दिवसापुर्वीच आमगाव पोलिसांनीही देशी कट्टयासह दोन आरोपींना ताब्यात घेतले होते.सदर व्यक्तीजवळ शस्त्र आढळून आल्याने तो घातपात करण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले असून ताब्यात घेत भादंवी कलम 3,25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक दिपक जाधव करीत आहेत.