27.4 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home गुन्हेवार्ता शहर पोलिसांच्या कारवाईत 30 हजाराची सुगंधीत तंबाखु जप्त

शहर पोलिसांच्या कारवाईत 30 हजाराची सुगंधीत तंबाखु जप्त

0
1265

गोंदिया,दि.16ःसध्या देशासह राज्यातही करोना ससंर्गाचा प्रादुर्भाव ऱोखण्यासाठी संचारबंदी लागू आहे.परंतु या संचारबंदीच्या काळातही अवैध व्यवसायिक मात्र आपल्या व्यवसायाला आडमार्गाने सुरु ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समोर आले आहे.गोंदिया शहर पोलिसाना मिळालेल्याम माहितीच्या आधारे 15 मे रोजी कारवाई करुन 36 पोतीमधून 30 हजार 150 रुपयाचा सुगंधित तंबाखू जप्त केला आहे.सविस्तर असे की सध्या संचारबंदीत पानठेल्यातून पान व तंबाखुजन्य पदार्थ विक्रीवर निर्बंध असतानाही मोठ्याप्रमाणात आडमार्गाने त्याची विक्री सुरु आहे.त्यातच शहरातील कृष्णापुरा वार्डातील एका घरात धाड घालून 36 पोती तंबाखू पोलिसांनी हस्तगत केली आहे. धर्मेंद्र महेश चौरसिया(वय 36) यांच्या कृष्णपुरा वार्डातील घरातून 27 पोती किंग तंबाखू (प्रत्येक पोती 4.5 किलो वजन) 21 हजार 500 रुपये किमतीचे तसेच लूज तंबाखू 9 पोती(प्रत्येक पोती 10 किलो ग्राम) असा 30 हजार 150 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करुन आरोपीला ताब्यात घेत कलम 188, 269 भांदवि अन्वये गुन्हा नोंदविला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे,अति.पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे, गोंदिया शहर ठाणे पोलीस निरिक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरिक्षक गवते,पोलीस हवालदार मिश्रा,बिसेन,मेहर,मेश्राम व बिसेन यांनी केली.