साकोली,दि.२ :तालुक्यातील जवळच्या बाम्पेबाडा येथे शेतात विजेचा धक्का बसल्याने पतीपत्नीचा मृत्यू झाला. मृतांची नावे माणिक आकरे ( वय ६०) आणि फुलन आकरे (वय ५५) अशी आहेत.मृत पती-पत्नी शेतात काम करीत होते. त्यांच्या शेतातून विजेची लाइन गेली आहे. दुपारी साडेचार वाजता कुंपनाला बांधलेली तार काढण्यासाठी माणिक आकरे यांनी हात लावला. परंतु त्यांना जोरदार धक्का बसून कोसळले. तेव्हा पती पडलेला पाहून फुलन आकरे धावून जवळ आल्या. त्यांनासुद्धा धक्का बसला व दोघांचा मृत्यू झाला.




