24.8 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home गुन्हेवार्ता खरबी चेकपोस्टवर कारचालकाने उडवले पोलिसांना

खरबी चेकपोस्टवर कारचालकाने उडवले पोलिसांना

0
974

भंडारा,दि.06 : भंडारा जिल्हयात कोरोना संसर्ग होऊ नये या करिता नागपूर- भंडारा सीमेवरील खराबी नाका  या ठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आले आहे.या चेकपोस्टवर आरोग्य तसेच पोलीस विभागाचे कर्मचारी 24 तास कार्यरत असतात त्यातच आज शनिवारला सकाळी 7.30 वाजेच्या दरम्यान नागपूर कडून भंडाराच्या दिशेने येणाऱ्या कार चालकाने सीमेवरवर असलेल्या चेक पोस्टच्या तंबुला धडक दिल्याची घटना घडली.या धडकेत तंबुतील कर्मचारी जखमी झाले तर काररस्तालगतच्या नालीमध्ये जाऊन फसली.या अपघातात दोन पोलीस, व चारचाकी वाहनचालक असे तिघे जण जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले आहे.जखमीमध्ये पोलीस उपनिरिक्षक विवेक राऊत,पोलीस नायक निलेश नन्नीर व कारचालक परसोडी निवासी बालक जांभुळकर यांचा समावेश आहे.