31.3 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home गुन्हेवार्ता लाचखोर सहाय्य्क पोलीस निरीक्षकास अटक

लाचखोर सहाय्य्क पोलीस निरीक्षकास अटक

0
558

चंद्रपूर,दि.17ः येथील अपघाताच्या गुन्ह्यात तक्रारदाराला आरोपी न करण्याच्या कामासाठी चंद्रपूर येथील रहिवासी असलेले तक्रारदार यांना वरोरा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश खाडे यांनी १० हजाराची मागणी केली. याबाबत त्यांनी एसीबी चंद्रपूर येथे तक्रार दिली त्याच्या आधारावर एसीबीने सापळा कारवाईचे नियोजन करून सहायक पोलीस निरीक्षक रमेश संपतराव खाडे लाचेची रक्कम रु.१० हजार तक्रारदाराकडून घेताना जाळ्यात अडकले. त्यांच्यावर लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अप्पर पोलीस अधीक्षक राजेश दुधलवार यांच्या नेतृत्वात उपअधीक्षक अविनाश भामरे
ला.प्रा.वि. चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आणि कार्यालयीन कर्मचारी नापोका.अजय बागसरे, पोकाँ
रवीकुमार ढेंगळे, रोशन चांदेकर, वैभव गाडगे, चालक दाभाडे यांनी केली आहे. सदर कारवाईने पोलीस खाते दणाणले
असून वाहतूक पोलिसांनी महिन्यावारी हप्ता कसा घ्यावा असा धसका घेतला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने वरोरा तालुक्यातील पोलिसांच्या खाकी वर्दीला डाग लागला असून त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचीन्ह निर्माण झाला आहे.