नागपूर,दि.18ः महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती आणि प्रभाग क्रमांक ५ चे विद्यमान भाजप नगरसेवक प्रवीण भिसीकर यांना जुगार खेळताना गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक – ३ च्या पथकाने अटक केली आहे. भिसीकर यांच्यासह इतर ७ आरोपींना देखील पथकाने अटक करून बजाजनगर पोलिस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या जुगार्यांकडून पोलिसांनी एकूण १९ लाख ८0 हजार २00 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुप्त महितीच्या आधारावर पथकाने छापामार कारवाई केली. बजाजनगर पोलिस ठाणे हद्दीत प्लॉट क्रमांक ४, आनंदनगर अत्रे ले-आऊट, एनआयटी उद्यानाजवळ असलेल्या संजय लाटकर यांच्या घरी पथकाने छापा टाकला. याठिकाणी प्रवीण विलासराव भिसीकर (वय ४0 वर्ष, राहणार, तीन नल चौक, कसारपुरा), संजय भाऊराव कुराडे (वय ५४ वर्ष, राहणार १४, मंगलधाम सोसायटी, टाकळीसिम), नरेंद्र व्यकंटराव मेर्शाम (वय ४६ वर्ष, राहणार ८५, प्लॉट नंबर २, जोगीनगर), प्रवीण मनोहर पराते (वय ३३ वर्ष, राहणार १0७, विणकर कॉलनी मानेवाडा रोड), सुरेश महादेवराव भोयर (वय ५४ वर्ष, राहणार, प्लॉट नंबर ४0, धोटे ले-आऊट), नीलेश केशवराव मोहाडीकर (वय ३४ वर्ष, राहणार ११५, विणकर कॉलनी) रमेश रुपलाल जाधव (वय ५४ वर्ष, राहणार, १६५, एच.बी. इस्टेट), ज्ञानराव नत्थुजी धार्मिक (वय ४२ वर्ष, राहणार, प्लॉट नंबर ३२, साईनगर जयताळा) हे तास पत्यावर जुगार खेळताना मिळून आले. सर्व आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही कारवाई अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे) नीलेश भरणे, पोलिस उप आयुक्त (डिटेक्शन) गजानन राजमाने, सह पोलिस आयुक्त सुधीर नंदनवार, किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, सह पोलिस निरीक्षक पंकज धाडगे, रफीक खान, प्रशांत लाडे, अनिल दुबे, शैलेश पाटील, अरूण धर्मे, श्याम कडू, अमित पात्रे, प्रवीण गोरटे, मो. शारीफ, राजू पोतदार यांनी केली





