नागपूर,दि.18 : बनावट दारूच्या निर्मितीसह स्पिरिट मद्यसाठा साहित्य जप्त करत जरीपटका पोलीस ठाणेंतर्गत सुगतनगरातील एका आरोपील अटक करण्यात आलेली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली. काररवाईत ८५ हजार ६५0 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमर रिझुमल मूलचंदानी (वय ३३ वर्ष, रा. सुगतनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पुढील तपास सुरू आहे.
जप्त करण्यात आलेल्या साहित्यात विदेशी दारूच्या १८0 मि.ली. २८0 बॉटल (अंदाजे किंमत ४ हजार २00 रुपये), एम्प्रेरीअर ब्ल्यू विदेशी दारूच्या १८0 मि.ली. १९0 बॉटल (अंदाजे किंमत २६ हजार ६00 रुपये), २00 लिटर क्षमतेच्या एक प्लास्टिक बॅलर स्पिरिटने पूर्ण भरलेल्या (अंदाजे किंमत ६ हजार ७00 रुपये) २00 लिटर क्षमतेच्या एक प्लास्टिक बॅलर स्पिरिटने १५0 लिटर (अंदाजे किंमत ५ हजार २00 रुपये) २00 लिटर क्षमतेच्या दोन प्लास्टिक बॅलर स्पिरिटने रिकामे (अंदाजे किंमत १ हजार ४00 रुपये), २0 लिटर क्षमतेच्या १६ प्लस्टिक कॅन रिकामे अंदाजे किमत (३ हजार २00 रुपये) ५ लिटर क्षमतेच्या २ प्लस्टिक कॅन रिकामे (अंदाजे किंमत १00 रुपये), बाँबे स्पेशल व्हिस्की ७५0 मी.ली च्या २२ रिकाम्या बॉटल (अंदाजे किंमत ५0 रुपये) आदी असा मिळून ८६ हजार ५00 रुपये कि मतीचा मुद्देमाल जप्त केला. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे तसेच विभागीय उपआयुक्त मोहन वर्दे यांच्या आदेशानुसार अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रावसाहेब कोरे यांनी कारवाई केली. यामध्ये दुय्यम निरीक्षक दिलीप बडवाईक व अरक संजय मोरे, प्रशांत येरपुडे, चंद्रशेखर दरोडे, कॉन्स्टेबल राहुल पवार, महादेव कांगणे, आशीष फाटे, वाहन चालक राजू काष्टे व रवी निकाळजे, सोनाली खांडेकर यांनी विशेष मेहनत घेऊन मोहीम यशस्वी केली.





