वर्धा,दि.25 – जिल्ह्यातून जाणार्या महामार्गावर बुधवारला झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले. नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर वर्धा सीमेजवळ केमिकल पावडर घेऊन नागपूरकडे भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक अनियंत्रित होऊन नाल्यात उलटला. यात दोघांचा मृत्यू झाला. तर सहा जण गंभीर जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी नागपूरला पाठविण्यात आले आहे. रामनरेश सोनी, राजेश वाकोडे या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला. अपघाताची माहिती महामार्ग पोलिसांना मिळताच जाम पोलिस चौकीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत कर्हाडे, ज्योती राऊत, गणेश पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व जखमींना नागपूरला उपचारासाठी पाठविण्यात आले.




