26.9 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home राष्ट्रीय देश सहकारी बँकांही रिझर्व्ह बंँकेच्या नियंत्रणात

सहकारी बँकांही रिझर्व्ह बंँकेच्या नियंत्रणात

0
463

नवी दिल्ली, 25 जून – देशातील 1.483 सहकारी बँका तसेच 58 बहुराज्यीय सहकारी बँकांसह सर्व सरकारी बँका आता थेट रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली आणण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती नंतरसूचना व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर,पंतप्रधान कार्यालयाील राज्यमंत्री जितेंद्रसिंह तसेच पशूसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री गिरिराजसिंह यांनी पत्रपरिषदेत दिली. आतापर्यंत फक्त बहुराज्यीय सहकारी बँकाच रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली होत्या. आता मात्र सर्व सहकारी बँका रिझर्व्ह बँंकेच्या नियंत्रणाखाली आणण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठीच्या एका अध्यादेशाला आज मंत्रिमंडळाच्या  बैठकीत मान्यता देण्यात आली. आता मंजुरीसाठी हा अध्यादेश राष्ट्रपतींकडे पाठविण्यात येणार आहे. सहकारी बँकातील आपला पैसा सुरक्षित आहे, याची जनतेला खात्री वाटावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला,असे प्रकाश जावडेकर यांनी  सांगितले. देशातील 1540 सहकारी बँकात 8 कोटी 60 लाख खातेधारक असून त्यात 4 लाख 84 हार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत, असे जावडेकर म्हणाले.