तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात भाग्यश्री प्रथम

0
24

गोरेगाव दि. ६:: अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा परशुराम विद्यालय मोहगाव बु. येथे पार पडला. यात आठवी ते दहावीच्या तालुकांतर्गत शाळांच्या १९ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. मेळाव्याचा विषय ‘प्रकाशाचा उपयोग : शक्यता व आव्हाने’ असा होता. स्पर्धकांनी चार्ट्स व मॉडेल्स यांचा आधार घेवून विषयाचे विवेचन केले. दहा गुणांची लेखी चाचणी झाली. यात पी.डी. रहांगडाले विद्यालय गोरेगाव येथील भाग्यश्री चौधरी, किरसान मिशन हायस्कूल गोरेगावची खुशबू हरिणखेडे द्वितीय तर रविंद्र विद्यालय चोपा येथील प्रियंका बिजेवारने तृतीय क्रमांक मिळविला. स्पर्धा परीक्षण जगत कॉलेज गोरेगावचे प्रा. रहांगडाले, प्रा. कटरे, प्राचार्य आकरे यांनी केले. उद्घाटक गटशिक्षणाधिकारी वाय.पी. कावडे, अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रहांगडाले होते. अतिथी म्हणून गट समन्वयक टी.बी. भेंडारकर व विस्तार अधिकारी खोब्रागडे उपस्थित होते.