23.8 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home शैक्षणिक आंतरशालेय रोलर स्केटिग स्पर्धेत प्रोग्रेसिव्हचे यश

आंतरशालेय रोलर स्केटिग स्पर्धेत प्रोग्रेसिव्हचे यश

0
23

गोंदिया,दि.२७ -गोंदिया जिल्हा बाह्य आंतरशालेय रोलर स्केटिग स्पर्धेचे आयोजन सर्कस ग्राऊंडमध्ये करण्यात आले होते. यात श्रीमती उमादेवी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे संचालित प्रोग्रेसिव्ह इंग्लिश स्कूल (सीबीएसई), प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनल (आयसीएसई) चे विद्यार्थी सहभागी झाले. कु. स्वरा कुकडे, कु. अनन्या खंडेलवाल, कु. प्रणाली राऊत, कु. श्रुती नीनावे, राम कटकवार, धुर्व वैद्य, अंबिका कटकवार, माहसीसा पटेल, कल्यानी चिक्कुरे, उज्जैनी गणवीर सार्थक भुषारी यांनी अभूतपूर्व कामगिरी करून रोलर स्केटिग स्पर्धेत यश पटकावले.
सर्व यशस्वी विद्याथ्र्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-बाबा, संस्थाध्यक्ष पंकज कटकवार, सचिव निरज कटकवार, प्राचार्य ओ.टी. रहांगडाले, भाग्यश्री शर्मा, प्रमोद वाडी, महेंद्र हरिनखेडे व क्रीडा शिक्षिका हेमा नायडू, पंकज खैरे, उपेंद्र थापा यांना दिले आहे.

blank