कोहळी समाजातर्फे गुणवंतांचा सत्कार

0
8

भंडारा दि.२७ -: कोहळी समाज विकास मंडळ भंडारातर्फे संताजी मंगल कार्यालय भंडारा येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी आ. बाळा काशिवार, प्रमुख अतिथी गजानन संग्रामे, हेमंत शहारे यांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यास उमाशंकर पर्वते, वामनराव खुणे, डॉ. नरहरी खुणे, हिरामण लांजे, डोमा कापगते, रामचंद्र कापगते, दिलीप बोरकर, डॉ. हेमकृष्ण कापगते, नीलकंठ लंजे, गजानन बोरकर, गोविंद कापगते, वर्षा नाकाडे, प्रकाश बाळबुधे, विवेक लंजे, एस.एस. बोरकर, विश्‍वनाथ खुणे आदी उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थी वर्ग १२ सौरभ खुणे, प्रियंका बाळबुधे, वर्ग १0 विनयकुमार गहाणे, राहुल काशीवार, गीतेश्‍वरी नाकाडे, अपर्णा नागपुरे, सायली शहारे, प्रणव कापगते, भुपेश कापगते, उमेश काशीवार, नेहा पुष्पतोडे, पार्थ कापगते, सारंग लांजेवार, धवल हातझाडे, वल्लभ बोरकर, आरती कापगते, मनीष झोडे, अनिरूद्ध कापगते, पल्लवी मुंगुलमारे, मृणाल झोडे, भ्रमर पुस्तोडे, श्‍वेतांबरी लंजे, मिनल कापगते, संकेत लोथे, शिवानी लंजे, प्राजक्ता लंजे, विकेश खुणे, पुजा बोरकर, दामोधर गौपाले, लक्ष्मीकांत डोंगरवार, आचल लोथे आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख बक्षिस व रौप्य पदक देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बाळा काशीवार यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या उज्ज्वल भविष्याची कामना करून विद्यार्थ्यांना समाजकार्यव कुटुंबात फार मोलाचे सहकार्य करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक वामनराव गायकवाड, संचालन सहसराम बन्सोड, आभार प्रदर्शन डॉ. दशरथ कापगते यांनी केले. कार्यक्रमाकरिता रामजी शहारे, डॉ. राजेश कापगते, संजय खुणे, सुनील लंजे, शिवशंकर नाकाडे, दीपक लंजे यांनी प्रयत्न केले.