देवरीत १३ शिक्षकांसह ७ सेवानवृत्तांचा सत्कार

0
19

देवरी , दि. १६: पंचायत समिती शिक्षण विभाग व पं.स. पदाधिकार्‍यांच्या वतीने तालुक्यातील १३ उत्कृष्ट शिक्षक व सात सेवानवृत्त शिक्षकांचा शनिवारी सत्कार करण्यात आला.
उद््घाटन प्राचार्य महेंद्र मेश्राम यांच्या हस्ते, पं.स. उपसभापती संगीता भेलावे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. अतिथी म्हणून गटविकास अधिकारी मेश्राम, गटशिक्षणाधिकारी के.जी. भांडारकर, पं.स. सदस्य मेहतरलाल कोराम, गणेश तोपे, विस्तार अधिकारी येटरे, दिघोरे, प्राचार्य रजिया बेग, अन्नू शेख उपस्थित होते.
याप्रसंगी तालुक्याच्या प्रत्येक केंद्रातील उत्कृष्ट शिक्षकांचा शाल, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यात मुख्याध्यापक पी.एस. उके (लोहारा), ए.एम. नान्हे (पुराडा), एम.एल. गिर्‍हेपुंजे (धमदीटोला-परसोडी), एस.टी.कोटांगले (गोटाबोडी), ए.जी. पवार (चुंभली), के.व्ही. भांडारकर (पांढरवाणी), एस.आर. प्रधान (हरदोली), ओ.ऐ. ढवळे (भरेगाव), ए.बी. भोंगाडे (सिंदीबिरी), जे.जे. पडोले (सुंदरी), एम.के. सयाम (रेहळी), आर.आर.बोरकर (येळमागोंदी), सी.जे. हेमके (चिल्हाटी) यांचा समावेश आहे.
तसेच सेवानवृत्त शिक्षकवृंदांमध्ये सेवानवृत्त मुख्याध्यापक एस.एस. कळबे, एस.एच. मारगाये, आर.आर. मुरकुटे, एन.पी. गभणे, एफ.आर. पटले, आर.डी. ठवरे यांचा समावेश आहे. यांचासुद्धा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.संचालन एस.टी. गजभिये यांनी केले. आभार लोकनाथ तितराम यांनी मानले.